- November 29, 2025
- No Comment
२७७ दिवसांनंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याला कोथरुड आय टी इंजिनिअर मारहाण प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे : रस्त्यात मिरवणुक सुरु असल्याने वाहतूक कोंडी झाली असताना झालेल्या वादातून आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणात कुख्यात गुंड गज्या मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
शिवजयंतीची मिरवणुक सुरु असताना कुख्यात गुंड गजानन मारणे व त्याचे साथीदार चित्रपट पाहून घरी जात होते. त्यावेळी वाटेत मिरवणुक सुरु असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यात वादावादी होऊन एका आय टी
इंजिनिअरला गजा मारणे याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. हा आय टी इंजिनिअर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचा असल्याचे
सांगण्यात आले. मोहोळ यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर कोथरुड पोलिसांनी गजा मारणे याच्या चिथावणीमुळे त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला. गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले की, विशेष मोक्का न्यायालयाकडून गजानन मारणे याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.




