- November 30, 2025
- No Comment
पिंपरी पोलिसांचा तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यावर छापा; हॉटेल मालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल 80 हजारांचा माल जप्त
पिंपरी: शिरगाव येथील लोढा सोसायटीत तीन पत्ती जुगार
खेळणाऱ्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने धाड टाकून एका हॉटेल मालकासह ६ जणांना पकडले त्यांच्याकडून ७९ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार अंजनराव सोडगिर यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हॉटेलमालक संदिप राजेंद्र वडमारे (वय ३५, रा. साईसृष्टी, अपार्टमेंट, गणेशनगर, पिंपळेगुरव), बार मॅनेजर संजयकुमार रेणसिद्ध गुत्तेदार (वय ३०, रा. मुळा नगर, जुनी सांगवी), अरुण लालबहादुर खरोसे (वय २७, रा. जयराज रेसिडेन्सी, सांगवी), सुरेश दिगंबर माळी (वय ४५, रा. हेरीडेज सोसायटी, जुनी सांगवी), अमन संजु सेनानी (वय ३५, रा. भालेकरनगर, पिंपळे गुरव), चित्रसेन भगवान घरवाडवे (वय ३३, रा. साईसृष्टी, पिंपळेगुरव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.