- December 11, 2025
- No Comment
गुंड बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा; विशेष न्यायालयाने दिली परवानगी
पुणे :आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले गुंड बंडू आंदेकर, त्यांची भावजय माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यास मार्ग मोकळा झाला आहे. विशेष न्यायालयाने ‘मकोका’ अंतर्गत आरोपींना निवडणूक लढवण्यास परवानगी दिली असून, निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचे नमूद केले आहे. नामांकन आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्त मागण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे. आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर यांच्यासह एकूण पंधरा जण न्यायालयीन कोठडीत आहेत.