• September 25, 2022
  • No Comment

मॉन्जिनीज’ची फ्रेंचाइजी देणार सांगत 12 लाखांना घातला गंडा

मॉन्जिनीज’ची फ्रेंचाइजी देणार सांगत 12 लाखांना घातला गंडा

रावेत: मॉन्जिनीज केक शॉपची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 12 लाख रुपायांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 8 ते 20 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

राजेश किरणचंद संघवी (वय 53, रा. रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9593203357 क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संघवी यांना मॉन्जिनीज कंपनीचे केक शॉप सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन माहिती घेतली. त्यांनी 18001216986 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने संघवी यांना [email protected].in या ई-मेल आयडीवर अर्ज करण्यास सांगितले.

संघवी यांना तीन बँक खात्याचे डिटेल्स पाठवून त्यावर 12 लाख 12 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्या बदल्यात त्यांना इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल सामान, केकचे प्रकार पाठविण्यात येणार होते. मात्र आरोपींनी त्यांना केक शॉप संबंधित कोणतेही सामान न पाठवता त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *