- October 1, 2022
- No Comment
बांधकामात परस्पर फेरफार करत केली फसवणूक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
काळेवाडी: फ्लॅट धारकांच्या संमतीशिवाय बांधकामात बदल केला. सोसायटी स्थापन न करता इमारतीमधील मालकी हक्क फ्लॅट धारकांच्या नावे न करता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार सन 2005 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत काळेवाडी येथे घडला.
कुट्टन नानू नायर (वय 53, रा. काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद डेव्हलपर्सचे विकासक राजेंद्र अनंतकुमार बिजलानी आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद डेव्हलपर्सचे विकासक आरोपींनी अमृतधाम सोसायटीचे नकाशे, तपशील जाहीर केले. त्यातील फ्लॅट फिर्यादी आणि इतर सभासद घेण्यासाठी तयार झाले. त्यानंतर ग्राहकांच्या संमतीशिवाय आरोपींनी सोसायटीच्या बांधकामात फेरफार, बदल, वाढ केली. सोसायटी स्थापन केली नाही. सदस्यांकडे जमिनीतील व इमारतीमधील हक्क, मालकी हक्क व हितसंबंध यांचे हस्तांतर न करता दस्तऐवज करून न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वाकड पोलीस तपास करीत आहेत.