- October 1, 2022
- No Comment
कर्ज देण्याच्या बहाण्याने चार लाखांना घातला गंडा
चिंचवडः व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने एकाची चार लाखांची फसणूक केली आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.
डॉ. विकास अझित एच (वय 50, रा. पाषाण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोलन मुदलियार, जयशंकर (पूर्ण नाव नमुद नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चिंचवड येथे अवनीरा बायोटेक ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचा व्यवसाय वाढीसाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी कर्ज मिळण्याबाबत चाचपणी केली. त्यावेळी आरोपींनी त्यांना कर्ज मंजूर करून देतो, असे खोटे आश्वासन दिले. कर्ज मंजूर करून देण्यासाठी फिर्यादींकडून चार लाख रुपये घेऊन कर्ज मंजूर करून न देता त्यांची फसवणूक केली.
निगडी पोलीस तपास करीत आहेत.