- October 2, 2022
- No Comment
कोयत्याचा धाक दाखवून तरुणाची लुट, तीन टाळक्यांवर गुन्हा दाखल

सुतारवाडी: पायी घरी जाणाऱ्या तरुणाला तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले आहे. हा प्रकार जाभुळांई मंदिराच्या पुढे सुतारवाडी येथे घडला आहे.
याप्रकरणी ओंकार रविंद्र चव्हाण (वय 20 रा.सुतारवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी घरी जात होते. यावेळी तीन जण दुचाकीवरून आले,त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. यावेळी त्यांनी फिर्यादीला कोयत्यासारख्या हत्याराचा धाक दाखवून त्यांचा मोबाईल, 10 ग्रॅम वजनाची साखळी व रोख रक्कम 5 हजार असे एकूण 75 हजार रुपयांना लुटले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.





