- October 2, 2022
- No Comment
पतीच्या हातुन पत्नीचा मृत्यू, पती जेरबंद
देहु: पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा चक्क मृत्यू झाला आहे. ही घटना देहुगाव येथे घडली.
यातील आरोपी पती सोहन प्रभाकर साठे (वय 45 रा.देहुगाव) याला देहुरोड पोलिसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात 29 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण रंजिता सोहन साठे (वय 39) असे मयत महिलेचे नाव आहे. आरोपीने केवळ चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला घरासमोरील रस्त्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये पत्नीचा चक्क मृत्यू झाला. यावेळी भर रस्त्यात मारहाण होत असताना कोणीही आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला नाही का असा सवाल उपस्थित होत आहे. या मारहाणीतच पत्नीचा मृत्यू झाला. देहुरोड पोलिसांनी पतीला बेड्या ठेकल्या असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.