- October 2, 2022
- No Comment
लग्नाचे आमिष दाखवून तरुणी गरोदर, आरोपी गजाआड
वाकडः स्वतःचे लग्न झालेले असतानाही तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गरोदर केले व तिच्याशी लग्न करण्यास नकार देणाऱ्या इसमाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार भुगाव व पिंपळे गुरव या परिसरात झाला.
याप्रकरणी 29 वर्षीय पीडितेन वाकड पोलीसात शुक्रवारी (दि.30) फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी नविन लक्ष्मण बहादुर (वय 40 रा. पिंपळे गुरव) याला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे लग्न झालेले असताना देखील त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. पीडिता यामध्ये गरोदर राहिली, तिला मुलगीही झाली. यावेळी मात्र आरोपीने लग्नास नकार देत पीडिता व तिच्या मुलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पुढिल तपास वाकड पोलीस करत आहेत.