- October 2, 2022
- No Comment
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकार देणार नुकसान भरपाई
राज्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी शेतात साचून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पिकाचे पूर्णपणे नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई अनुदान देण्याचे जाहीर केले होते. नुकसान भरपाई अनुदान वाटप करण्यासाठी सरकारने 27 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे.
शेतकऱ्यांना खाली दिलेल्या माहिती प्रमाणे नुकसान भरपाई अनुदान मिळणार आहे.
जिरायत शेतीसाठी – 13600 रुपये हेक्टरी अनुदान
बागायत शेतीसाठी – 27 हजार रुपये हेक्टरी अनुदान
फळबाग शेतीसाठी – 36 हजार रुपये हेक्टरी अनुदान