- October 2, 2022
- No Comment
शेअर बाजारात पैसे दुप्पट वाढ सांगत, तेरा लाखांना घातला गंडा
निगडी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 13 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार निगडी परिसरात घडला.
बबन चंदर खोडवे (वय 64, रा. संभाजीनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. 30) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार रवी गवळी (रा. चिंचपोकळी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी खोडवे यांच्या सोसायटीमध्ये राहणारा बजरंग कांगणे यांच्या ओळखीचा आहे. त्याने फिर्यादींना भेटून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास त्याचा परतावा देतो, असे आश्वासन त्याने दिले. फिर्यादीने रवी गवळी याच्याकडे विश्वासाने पंधरा लाख रुपये दिले. त्यातील 13 लाख 13 हजार रुपये रवी याने स्वतःच्या फायद्याकरिता वापरून फिर्यादी यांची फसवणूक केली.
निगडी पोलीस तपास करीत आहेत.