- October 4, 2022
- No Comment
कर्ज देण्याच्या बहाण्याने एकशे पंच्याऐंशी जणांची फसवणुक
वाकड: कर्ज देण्याच्या बहाण्याने सुमारे 185 जणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्यांना तीघांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्यात एका हॉटेल व्यावसायिकाने याप्रकरणी तक्रार दिली होती.
बालाजी उर्फ एकनाथ बळीराम घोडके (वय 32 रा. यवत),संग्रामसिंह अरुणराव यादव (वय 46 रा. कोल्हापूर) व राजविर ऊर्फ हसन अकबर मुजावर (वय 30 रा. कोल्हापूर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यात अहमदनगर येथील अमोल माणिकराव पाचपुते यांनी तक्रार दिली होती. ज्यामध्ये हॉटेलच्या नुतनीकरणासाठी पाच कोटींचे कर्ज देतो म्हणून कर्जाची प्रोसिंग फीस म्हणून 2 लाख 45 हजार रुपये घेतले मात्र कर्ज दिलेच नाही. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी बालाजी घोडके याला पोलिसांनी अटक केले नंतर कोल्हापूर येथीन इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीं कडून 185 विविध बँकाचे चेक ,कर्ज काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे , मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तीनही आरोपी हे पोलीस कस्टडी मध्ये असून पोलीस याचा पुढिल तपास करत आहेत.
आरोपी यांच्याकडे कोणताही परवाना नसताना नागरिकांना मोठ्या रकमेचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत होते. लोकांची गरज ओळखून ते कोट्यावधीचे कर्ज देण्याचा बहाणा करत लाखो रुपये हे प्रोसेसींग फीस साठी घ्यायचे व कर्ज द्यायचे नाहीत. अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चार येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदरची कारवाई गुन्हे शाखा चारचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सहायक पोलीस निरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, पोलीस हवालदार प्रविण दळे, आदिनाथ मिसाळ रोहिदास आडे, पोलीस नाईक वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, पोलीस शिपाई तुषार काळे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुगले यांनी केली.