• October 4, 2022
  • No Comment

चक्क खोटी कागदपत्रे बनवून बंगला विकण्याचा प्रयत्न

चक्क खोटी कागदपत्रे बनवून बंगला विकण्याचा प्रयत्न

    वाकड: बंगला विकण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बंगला विकण्याचा प्रयत्न करत फसवणूक केली. हा प्रकार पार्क स्ट्रीट वाकड येथे घडला.

    निलेश शांताराम पाटील (वय 43, रा. नाशिक) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित राजेंद्र गुप्ता (रा. यूएसए) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्क स्ट्रीट वाकड येथील डायमंड पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेल्या बंगला क्रमांक 21 या मिळकतीबाबत आरोपी आणि धीरज चंचलाणी यांचा वाद सुरु आहे. तरीही आरोपींनी फिर्यादीस कोणतेही वाद सुरु नसल्याचे सांगत, कोणताही मेंटेनन्स बाकी नसून सर्व कागदपत्र क्लिअर आहेत असे भासवले. सोसायटीची एनओसी मिळण्यासाठी आरोपींनी इंडेमिनीती बॉण्ड तयार करून फिर्यादींची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *