- October 4, 2022
- No Comment
मटका अड्ड्यावर छापा टाकून सव्वीस जण गजाआड
औंधः औंध परिसरातील मटका आड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी 26 जणांना ताब्यात घेतले असून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने औंध-बाणेर लिंक रोड परिसरात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खबर मिळाली की परिसरात कल्याण मटका व सोरट जुगार पैस लावून बेकायदेशीररित्या खेळत होते. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेऊन छापा टाकला असता जुगार अड्ड्याचा मालक व इतर 25 जणांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य 2 लाख 1 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सामाजीक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके, पोलीस अमंलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, हणमंत कांबळे, संदिप कोळगे, अमित जमदाडे यांनी केली.