• October 4, 2022
  • No Comment

दुचाकी वाहने व बॅटऱ्या चोरणारा सराईत गजाआड, युनिट-६ ची उल्लेखनीय कामगिरी

दुचाकी वाहने व बॅटऱ्या चोरणारा सराईत गजाआड,  युनिट-६ ची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: दुचाकी वाहने व बॅटऱ्या चोरणारा सराईत युनिट-६ ने जेरबंद केला आहे.

    शुभम ज्ञानेश्वर जांभूळकर (वय २४) रा.स.नं.१२ बुध्द विहार जवळ, बनसोडे चौक, लक्ष्मीनगर येरवडा पुणे मुळ रा. अजिंठानगर आकुर्डी पुणे. असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

     

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हयाचा तपास युनिट-६ मार्फत होत असताना, युनिट-६ कडील अंमलदार यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्ड वरिल गुन्हेगार शुभम जांभूळकर रा. येरवडा पुणे याने केलेला असून तो डोमखेलवस्ती रोड जवळील मोकळे मैदानात वाघोली पुणे येथे थांबलेला आहे. त्याचे ताब्यातील गाडी ही सुध्दा चोरीची आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने डोमखेलवस्ती वाघोली येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता त्याने गुन्हा केले बाबत कबुली दिली. सदर गुन्हयात त्यास

    अटक करुन पोलीस कस्टडीचे रिमांड घेतले. पोलीस कस्टडी दरम्यान आरोपिकडे अधिक तपास करता अहमदनगर येथील पोलीस स्टेशनचा ०१ वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणून असे एकूण ०५ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर आरोपीने वानवडी , हडपसर , सिंहगड रोड , उत्तमनगर , निगडी येथील प्रत्येकी ०१ बॅटरी चोरीचे व चाकण येथील ०२ बॅटरी चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिल्याने पुणे आयुक्तालयातील एकूण ०४ व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील ०३ बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. असे एकूण सदर आरोपीकडुन १२ गुन्हे उघडकीस आणून १,६९,५००/- रु.किं. चे ०५ दुचाकी वाहने व १४ बॅटऱ्या असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा अधिक तपास करीत आहोत.

    सदरची उल्लेखनिय कामगिरी ही युनिट ६ चे पोलीस उप नि. सुरेश जायभाय, पो.उप.नि. भैरवनाथ शेळके, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *