- October 5, 2022
- No Comment
कंपनीत दरोडा टाकणारी टोळी गजाआड, गुन्हे शाखा, युनिट-६ ची उल्लेखनीय कामगिरी
पुणे: कंपनीत दरोडा टाकणारी टोळी गुन्हे शाखा, युनिट-६, ने जेरबंद केली आहे. आरोपीं कडून स्टील व पितळेचे विटा, ५८४ किलो तांब्याचे तारा असा २,४७,८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अजय मांगीलाल काळे (वय २५) रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर जि. पुणे, रोहित रामदास वाजे (वय २७) रा. जुना मोशी आळंदी रोड, चौधरी ढाबा समोर, मानस अपार्टमेंट, फ्लॅट नं. ४ मोशी पुणे, वचिष्ठ श्रीमंत मुंढे (वय २१) रा. जोगेश्वरी हायस्कुल समोर, केसनंद वाघोली रोड, केसनंद, पुणे मुळगाव वडवणी ता. वडवणी जि.बिड, कुमार नामदेव शेलार (वय २२) रा. व्दारका निवास, काळूबाई नगर वाघोली पुणे, सुरज भैरवनाथ चौगुले (वय २३) रा. आव्हाळवाडी, वाईन शॉपचे पाठीमागे, मुळ गाव उत्तर वडगांव ता.करमाळा जि. सोलापूर, सुनिल कोळप्पा विटकर वय ३४ वर्षे, रा. काळूबाईनगर लेन नंबर ४, वाघोली पुणे. मुळगाव मार्डी ता. उत्तर सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा, युनिट-६, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत
पेट्रोलींग करीत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी त्याच्या साथीदारासह पांढऱ्या रंगाच्या सफारी कारमध्ये जाधववस्ती वाघोली पुणे येथे थांबलेला आहे. गुन्हे शाखा युनिट-६, ने जाधववस्ती वाघोली परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन वरिल सर्व आरोपीनी मिळून सदरचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात दिनांक २६/०९/२०२२ रोजी अटक करुन भा.दं.वि. कलम ३९५, ४११ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे. आरोपींचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्यांच्या कडे अधिक तपास केला असता त्यांनी ग्रामीण भागामध्ये लोड शेडींगचा प्राब्लेम असताना त्याचा फायदा घेऊन त्यांनी लोणीकंद व लोणी काळभोर या ग्रामीण भागात रात्रीचे वेळेस शेतकऱ्यांचे विद्यूत पंपांना वीज पुरवठा करणारे विद्यूत ट्रान्सफार्मर (डी पी) च्या चोऱ्या करुन डी पी मधील तांबे व ऑईल चोरी करुन सदरचा माल सुनिल कोळप्पा विटकर यास विकला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचेकडून स्टील व पितळेचे विटा, ५८४ किलो तांब्याचे तारा असा २,४७,८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे ६ व लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे ६ असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास युनिट- ६, करीत आहे.
सदरची उल्लेखनिय कारवाई ही युनिट ६ चे पोलीस उप नि. सुरेश जायभाय, पो. उप.नि. भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, अशफाक मुलाणी, व सुहास तांबेकर यांनी केली आहे.