- October 6, 2022
- No Comment
हातभट्टी दारू विक्रेत्यावर कारवाई, १० लिटर गावठी तयार दारु जप्त
हडपसर: हातभट्टी दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. १० लिटर गावठी हातभटटीची तयार दारु व रोख ८०० रुपये हा मुद्देमाल जप्त करून आरोपीस शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा हद्यीतुन २ वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.
दादाराव गोरख गोरे (वय- ४३) रा. स.न.४०५, डांगमाळीं आळी, हडपसर पुणे. असे आरोपीचे नाव अहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारी वाडा, वैभव थेअटर्स शेजारी, हडपसर पुणे जवळ आरोपी जवळ किंमत रु.११,८८०/- ची १० लिटर गावठी हातभटटीची तयार दारु व ५० प्लॅस्टिक पिशव्या, ८०० रुपये रोख रक्कम, ओपो कंपनीचा एक मोबाईल आपले कब्जात विनापरवाना, बेकादेशीररित्या बाळगून आपल्या ओळखीच्या लोकांना गावठी तयार हातभट्टी दारुची विक्री करीत असताना प्रोव्हीबीशन मालासह पकडण्यात आला.
सदर गुन्हया अंतर्गत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३९/२०२२ मु. प्रोव्हिबिशन अॅक्ट ६५ (ड) प्रमाणे दिनांक ०३/०६/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. वरील नमुद अटक आरोपी यांनी दाखल गुन्हा हा अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता केलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील सराईत गुन्हेगार हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचे विरूध्द यापुर्वी अवैध्दरित्या दारू विक्रीचे एकुण ०७ गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहेत.
म मा. पोलीस उप- आयुक्त परि. ०५, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ (१), (ब-ब) अन्वये त्यांच्याकडील कडील तडीपार आदेश क्र. ४२/२०२२, दिनांक २७/०९/२०२२ रोजी पासुन नमुद इसमासपुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा हद्यीतुन २ वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेले आहे.