- October 6, 2022
- No Comment
फ्लॅट देण्याचे आमिष दाखवत एकोणीस लाखांना घातला गंडा, आरोपी जेरबंद
दिघी: एका सोसायटी मधील फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने तिघांकडून 19 लाख 15 हजार रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार गणेशनगर बोपखेल येथे घडला. याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
महेश शामराव कोळगे (वय 41, रा. गणेशनगर, बोपखेल), दिलीप दशरथ लिंगवत (वय 45), एक महिला (वय 33) या तिघांची फसवणूक झाली आहे. महेश यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परिमल घुले, राजेश तुळशीदास चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या परिमल हाईट्स या सोसायटी मध्ये फ्लॅट देणार असे आमिष दाखवले. त्यापोटी महेश कोळगे यांच्याकडून पाच लाख 15 हजार रुपये, महिलेकडून पाच लाख रुपये, दिलीप लिंगवत यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले. पैसे घेऊन आरोपींनी फ्लॅट न देता तिघांची 19 लाख 15 हजारांची फसवणूक केली. ते फ्लॅट आरोपींनी दुसऱ्या लोकांना विकले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दिघी पोलीस तपास करीत आहेत.