- October 7, 2022
- No Comment
महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह परिवारावर जिवघेणा हल्ला
पिंपरी-चिंचवड : दांडियासाठी लावलेले मंडप काढताना झालेल्या वादातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह कुटुंबीयांवर हल्ला झाला आहे. यात रॉय यांच्यासह 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. हा प्रकार आज (गुरुवारी) रात्री काळभोरनगर येथे घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळभोरनगर येथील मांडव काढण्याचे काम सुरू होते. मांडववाल्याचे पार्किंगवरून रॉय यांच्या कुटुंबातील महिला सदस्यासोबत भांडण झाले. त्यावरून बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. मंडपवाल्याने मुले बोलावून घेवून डॉ. रॉय यांच्यावर हल्ला केला. त्यात 7 ते 8 जण जखमी झाले आहेत. सर्वजण पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.