- October 7, 2022
- No Comment
तरुणीशी अश्लिल वर्तन करणार्या रोड रोमिओंना बेड्या ठोकल्या, भोसरी पोलिसांची कामगिरी
नाशिक फाटा: दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लिल वर्तन करणाऱ्या रोड रोमिओंना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार फुगेवाडी ते नाशिक फाटा या पुणे-मुंबई महामार्गावर घडला.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून महेश अनिल वाघमारे (वय 20 रा. लांडेवाडी) व सागर मारुती हिवरे (वय 21 रा. दिघी रोड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून बसून जात होत्या.यावेळी आरोपी गाडी क्रमांक नसलेल्या वेस्पा गाडीवरून आले व त्यांनी फिर्यादीचा पाठलाग केला. त्यांनतर त्यांनी गाडी जवळ आणत फिर्यादीच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादीच्या पाठीवरून हात फिरवत अश्लिलवर्तन केले. फिर्यादीच्या मित्राने गाडी थांबवून जाबविचारला असता आरोपींनी मित्राला मारहाण करत त्याच्या खिशातील दोनशे रुपये जबरदस्तीकाढून घेतले. यावरून भोसरी पोलिसांनी तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.