- October 7, 2022
- No Comment
सहा महिन्यात दुप्पट पैसे देतो सांगत एकाची पंचवीस लाखांची फसवणूक
निगडी: सहा महिन्यात दुप्पट पैसे देतो म्हणून नागरिकाची 25 लाख रुपयाची फसणूक केली आहे. हा प्रकार निगडी येथे 2012 ते आज पर्यंत झाला असून याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास सुदाम भालेराव (वय 54 रा. रावेत) यांनी फिर्याद दिली असून मनोज नारायण पुंडे (वय 55 रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपीने गुंतवणूक कऱण्यासाठी 25 लाख रुपये देण्यास भाग पाडले. सहा महिन्यात या 25 लाख रुपयांचे 50 लाख रुपये करून देतो म्हणून पैसे घेतले मात्र आज अखेर पर्यंत पैसे दिले नाहीत. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी पुढील तपास करत आहेत.