- October 7, 2022
- No Comment
सहकारी गृहरचना संस्थेच्या व्यवहारात लाखोंची अफरातफर
हिंजवडी: सहकारी गृहरचना संस्थेच्या व्यवहारात तब्बल 89 लाख रुपयांची अफरा तफर झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार ब्लू रिज युनिट येथे घडली आहे.
याप्रकरणी उपेंद्र भानुदास बोरकर यांनी फिर्याद दिली असून समरेश विश्वभंर रंजन (सचिव), खजिनदार विनोदकुमार आलोक (वय 47 रा.ब्लूरीच सोसायटी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून विनोदकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 1 एप्रिल 2020 ते 21 मार्च 2021 या कालावधीत ब्लू रीच सहकारी गृहरचना संस्था हिंजवडी यांच्या व्यवहारात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ग्रामीण यांच्या जावक क्रमांक 2021 नुसार संस्था संचालक नसताना तसेच प्रशासकिय अधिकारी असूनही सर्व कारभार स्वतःच्या हातात घेऊन, बाहेरून संस्थेला माल पुरवणाऱ्या सोबत संगनमत केले. खोटी फर्म तयार करत संस्थेच्या खात्यातून तब्बल 89 लाख 60 हजार 676.36 रुपये काढून घेतले. संस्थेचे लेखापरिक्षण करताना हा प्रकार उघडकीस आला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.