- October 7, 2022
- No Comment
कीरकोळ वादातुन भाडेकरूवर चाकूने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
भोसरी: रूम मालकाचा मुलगा व इतर 6 जणांनी मिळून भाडेकरूस किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना बुधवारी भोसरी येथे घडली आहे. याबाबत पीडीत महिलेने फिर्याद दिली आहे.त्यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुन्नी उर्फ आरती आव्हाड, दीपक आव्हाड, सिद्धार्थ आव्हाड, आशा आव्हाड, आशा आव्हाड ची मैत्रीण, रोहित गवळी व रोहित गवळीची आई, सर्व रा. धोंडीबा गवळी चाळ, गणेश भाजी मंडई जवळ, भोसरी यांच्या विरोधात भादवि कलम 324, 452, 504, 506,143, 147 व 149 अन्वये भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा मुलगा दीपक घाडगे याने सार्वजनिक शौचालयात लघवी करून पाणी न टाकल्याच्या कारणावरून आरोपी मुनी आव्हाड हिने बुधवारी सकाळी 8.30 वा चे सुमारास त्याला मारहाण केली. तेव्हा फिर्यादी जाब विचारण्यासाठी गेल्या म्हणून त्याचा राग मनात धरून रूम मालक यांचा मुलगा रोहित गवळी याने काही कारण नसताना फिर्यादी यांचे पती श्रीकांत घाडगे यांच्या कानाखाली मारली.
त्यानंतर सर्व आरोपी घरात येऊन दीपक आव्हाड यांना लाकडी दांडक्याने मारहाण करू लागला तेव्हा फिर्यादीचे पती श्रीकांत घाडगे मदतीसाठी घरात आले असता आरोपी सिद्धार्थ आव्हाड याने फिर्यादी यांच्या पतीच्या कानाखाली मारली व धमकी दिली की आमच्या नादाला लागू नकोस नाहीतर खानदान संपून टाकेन. मुन्नी आव्हाड व आशा आव्हाड यांची मैत्रीण यांनी फिर्यादी ढकलून खाली पाडुन हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागले.
त्यावेळी फिर्यादी त्यांना हाताने विरोध करीत होते तेव्हा त्या दोघींनी फिर्यादीचे उजव्या हातावर चाकूने वार केला. तेव्हा फिर्यादी यांचा मुलगा मदतीसाठी आला. तेव्हा त्यांनी त्याला हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून किरकोळ जखमी केले आहे.