• October 8, 2022
  • No Comment

किरकोळ वादातून पत्नीचे डोके फोडले

किरकोळ वादातून पत्नीचे डोके फोडले

    चिंचवडः पत्नीने मुलांना चापट मारली म्हणून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिचे डोके फोडले. ही घटना बिजलीनगर, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे घडली.

    संदीप पाटील (वय 31), सासू, सासरे शांताराम पाटील (सर्व रा. बिजलीनगर वाल्हेकरवाडी चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस त्यांची दोन्ही मुले त्रास देत होती, म्हणून त्यांनी मुलांना दोन चापटा मारल्या. यावरून त्यांच्या सासू सासऱ्यांनी फिर्यादीस, तू इथे राहायचे नाही असे म्हणत शिवीगाळ केली. पती संदीप याला बोलावून घेत सासू सासऱ्यांनी फिर्यादीस मारहाण करण्यास सांगितले. पतीने फिर्यादीस मारहाण केली. यात फिर्यादींच्या डोक्याला चार टाके पडले. पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत, तुला काय करायचे ते कर असे म्हणून पतीने फिर्यादीस धमकी दिली.

    चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *