• October 8, 2022
  • No Comment

शंभर गुन्ह्यात सहाशे सत्तर आरोपींवर मोक्काची कारवाई, पुणे पोलिसांची उल्लेखनीय कारवाई

शंभर गुन्ह्यात सहाशे सत्तर आरोपींवर मोक्काची कारवाई, पुणे पोलिसांची उल्लेखनीय कारवाई

    पुणे: पुणे पोलिसांनी चालु वर्षात 100 गुन्ह्यांच्या अतंर्गत 670 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये केवळ खुनाच्या गुन्ह्यात 92 जणांवर तर खुनाच्या प्रयत्नात 353 जणांवर तसेच खंडणीच्या गुन्हयात 68 कारवाई करण्यात आली आहे.

    पुणे पोलिसांनी लोन अॅप फसवणूक करणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईचे शतक पूर्ण केले असून चालु वर्षात 37 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

    या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय ३६, रा. सोलापुर (टोळी प्रमुख), स्वप्नील हनुमत नागटिळक ( वय 29, रा. विजापुर रोड, सोलापुर) , श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय 26, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय 43, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापुर, सॅम्युअल संपत कुमार (वय 40 , डिकोजा रोड बेलातुर बंगलोर, कर्नाटक ), सय्यद अकिब पाशा ( वय 23, वर्षे रा. बेंगलोर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेग ( वय 22, रा.बेंगलोर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम ( वय 42, रा. कोझीकोड अरुर केरळ ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय 32, रा. पडघरा, केरळ) अशी ‘मोक्का’ नुसार कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार झोन एक मध्ये 7 गुन्ह्यात 48 जणांवर, झोन 2 मध्ये 20 गुन्ह्यात 135, झोन तिन मधील 16 गुन्ह्यात 110 जणांवर, झोन 4 मध्ये 19 गुन्ह्यात 134 जणांवर, झोन पाचमध्ये 22 गुन्ह्यात 150 जणांवर तर गुन्हे शाखा अंतर्गत 16 गुन्ह्यात 93 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *