• October 8, 2022
  • No Comment

वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना अटक चार परदेशी महिलांची सुटका

वेश्याव्यवसाय प्रकरणी दोघांना अटक चार परदेशी महिलांची सुटका

    कोरेगाव पार्क: पुणे शहर परिसरात मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 4 परदेशी मुलींची सुटका केली आहे.

    ही कारवाई पोलिसांनी कोरेगावपार्क येथे केली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी स्पाचा चालक व मॅनेजर यांना अटक केली असून त्यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव येथे एक स्पा चालक मसाज च्या नावाखाली वेशागमनासाठी परदेशी मुलींचा पुरवठा करतो. त्यानुसार पोलिसांनी नकली ग्राहक पाठवून सापळा रचून आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी तेथून चार परदेशी महिलांची सुटका केली. तसेच 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल यावली जप्त केला.

    ही कारवाई सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, महिला पोलीस अंमलदार मनिषा पुकाळे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,अजय राणे, प्रमोद मोहिते, संदिप कोळगे, अमित जमदाडे, पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *