• October 8, 2022
  • No Comment

संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

    एसटी कर्मचाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यानी मोठे आदेश दिले आहेत. एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    एसटी संप काळात बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. एसटी महामंडळासह मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. संप काळात जवळपास 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे यांचे आदेश दिले आहेत.

    राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी मिळाव्यात, तसेच महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महिने संप केला होता. सरकारने अल्टिमेटम देऊन सुद्धा कर्मचारी कामावर रुजु न झाल्याने एकूण 118 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं होतं.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *