• October 8, 2022
  • No Comment

दुकानात घुसून दुकानदारावर कोयत्याने वार

दुकानात घुसून दुकानदारावर कोयत्याने वार

दापोडी: दापोडी येथे भरदिवसा दुकानात घुसून दुकानदारावर कोयत्याने वार करत दुकानातील पैसे हे जबरदस्तीने नेल्याची घटना घडली.

रियाज लियाकत अली (वय 26, रा.बोपोडी) यांनी फिर्याद दिली असून भोसरी पोलीस ठाण्यात सैफ रैन, शादाफ शेख व त्यांचे दोन साथीदार सर्व राहणार दापोडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दुकानात बसले असता आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना नकार दिला असता, आरोपींनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. यात फिर्यादी जखमी झाले.

त्यांच्या खांद्यावर, दंडावर, मनगटावर वार करण्यात आले व दुकानातील 1 हजार 200 रुपये काढून घेतले. तसेच, हातात कोयते फिरवून जमा झालेल्या लोकांना इशारा करून आम्ही इथले भाई आहोत, कोणी पोलीसात तक्रार केली तर आम्हाला जो नडला त्याला कायमचा तोडला अशी धमकी देऊन परिसरात दहशत पसरवली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *