• October 12, 2022
  • No Comment

विवाहितेची छेड, रोडरोमियोवर गुन्हा दाखल

विवाहितेची छेड, रोडरोमियोवर गुन्हा दाखल

    वाकड: माझी टाईमपास होशील का, अशी विचारणा करत वयाने मोठ्या असलेल्या विवाहितेची छेड काढणाऱ्या रोडरोमियोवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड रोड येथे घडली.

    नागेश भंडारी (वय 19) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास सुदर्शन कॉलनी वाकड रोड येथे थांबल्या असताना आरोपी तिथे आला. त्याने फिर्यादी यांना माझी टाईमपास होशील का, असे विचारले. फिर्यादीने आरोपीला नकार देऊन त्यांच्या पतीला बोलावले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी महिलेशी वाद घालून त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तिथून जाताना आरोपीने माझे नाव नागेश भंडारी आहे, तुला बघून घेतो अशी धमकी दिली.

    वाकड पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *