मालमत्ता हस्तांतरण सेवा ऑनलाईन,पहा सविस्तर

मालमत्ता हस्तांतरण सेवा ऑनलाईन,पहा सविस्तर

पिंपरी-चिंचवड: कर संकलन विभागाच्या लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत अधिसूचीत केलेल्या 12 सेवांपैकी 7 सेवा या पूर्वीच ऑनलाईन केलेल्या आहेत. उर्वरीत 5 सेवांपैकी मालमत्ता हस्तांतरण ही सेवा 100 टक्के ऑनलाईन सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त या सेवांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. तसेच उर्वरीत 4 सेवा या 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन करण्याचा मानसही त्यावेळी त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांना जलद गतीने सेवा देण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. या ऑनलाईन सेवेच्या समारंभा बरोबरच नियमित व प्रामाणिक कर भरणाऱ्यांसाठी मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला फी नि:शुल्क करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींचे मालमत्तांना 30 जूनपूर्वी देय सवलतीचा लाभ आता संपूर्ण वर्षभर करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात नवीन आकारणी होणा-या मालमत्ता कर सवलत योजनापासून वंचित राहत होत्या. त्यांना देखील सवलत योजना लागू केल्या आहेत. याशिवाय नागरिकांना एकात्मिक व परस्पर बिल पेमेंट सेवा देण्याच्या उद्देशाने BBPS द्वारे पैसे भरणा करण्याची सुविधा आजपासून सुरु करण्यात येत असल्याचेही सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखलाही ऑनलाइन पद्धतीने काढण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी महापालिका दहा रूपये आकारणी करत होती. महापालिका वर्धापन दिनापासून नियमित व प्रामाणिक कर दात्यांसाठी आपुलकी व विश्वास निर्माण व्हावा यादृष्टीने दाखला नि:शुल्क देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या मालमत्तेला सामान्य करात 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना सवलतीचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपूर्वी कर भरण्याची मुदत होती. महापालिका वर्धापन दिनापासून दिव्यांग नागरिकांची मागणी व त्यांचे प्रती सदभावना विचारात घेऊन वर्षभर कधीही कर भरल्यास सवलतीचा लाभ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

चालू वर्षातील नवीन मालमत्तांना सामान्य करात सवलत यापूर्वी 1 एप्रिल रोजी आकारणी रजिस्टरला नोंद असलेल्या मालमत्तांना 30 जूनपूर्वी सामान्य कर सवलतीचा लाभ देय होता. चालू आर्थिक वर्षात नव्याने आकारणी व नोंदणी होणा-या मालमत्ता सामान्य करातील सवलत योजनांच्या लाभापासून वंचित राहत होते. मात्र आता चालू आर्थिक वर्षापासून अशा मालमत्तांना बिल निर्गतीपासून 3 महिन्यात किंवा 31 मार्चपूर्वी संपूर्ण कर भरल्यास सामान्य कर सवलत योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. तर, BBPS द्वारे विविध Wallets चा वापर तसेच कार्यालय ठिकाणी व ऑनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. आता नागरिकांना एकात्मिक व परस्पर बिल पेमेंट सेवा देण्याच्या उद्देशाने BBPS द्वारे पैसे भरणा करण्यासाठी विविध Wallets मार्फत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये GPay, PhonePay, Paytm यासारख्या Wallets ची सुविधा असणार आहे.

‘पिंपरी-चिंचवड महापालिका ही नेहमीच लोकभिमुख सेवा देण्यासाठी अग्रेसर आहे. सामान्य जनतेला देण्यात येणा-या सेवा या जास्तीत जास्त पारदर्शी व गतीमान पध्दतीने देण्याचा महापालिकेचा मानस असतो. या ध्येयाला अनुसरुनच कर आकारणी व कर संकलन विभागाच्या सर्व सेवा या ऑनलाईन करण्याचा निर्धार महापालिकेने केलेला आहे’.आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हणाले.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *