• November 1, 2022
  • No Comment

पतीला मारण्याची धमकी देत विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    निगडी: पतीला मारण्याची धमकी देत विवाहित महिलेला कारमध्ये बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार निगडी, आकुर्डी भागात वेळोवेळी घडला आहे.

    अख्तर वाजिदअली शेख (वय 38 ,रा. रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने रविवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस त्याच्या कारमध्ये बसवून कार रस्त्याच्या बाजूला उभी करून फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. तुझ्या पतीला सोडून दे, मी तुला आयुष्यभर सांभाळतो असे आरोपीने फिर्यादीस म्हटले. झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या पतीला जीवे मारीन,अशी आरोपीने धमकी दिली. फिर्यादीस ब्लॅकमेल करून वारंवार भेटायला बोलावून त्यांच्या पतीला घडलेला प्रकार सांगण्याची धमकी देत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *