• November 2, 2022
  • No Comment

पोलीस कारवाईतून महापालिकेला छप्पंन लाखाचा फायदा

    पिंपरी-चिंचवड: बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी तसेच पे अ‍ॅन्ड पार्कला बळकटी यावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना पाच टोइंग व्हॅन दिल्या. या कारवायांमधून काही रक्कम महापालिकेला देण्याचा निर्णय झाला. गेल्या सहा महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत 55 लाख 77 हजार 394 रुपये जमा झाले आहेत.

    महापालिकेने या पूर्वीच शहरात पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्यास सुरुवात केली. मात्र, पे अ‍ॅन्ड पार्कच्या ठिकाणी वाहने उभी न करता नागरिक कुठेही बेशिस्तपणे वाहने उभी करीत असल्याचे दिसून आले. अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी पोलिसांना केली. मात्र कारवाईसाठी आमच्याकडे टोईंग व्हॅन नसल्याचे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना सांगितले. यामुळे महापालिकेने कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना टोईंग व्हॅन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली.

    पाच टोईंग व्हॅन आणि प्रत्येक टोईंग व्हॅनवर पाच कर्मचारी असा संच ठेकेदाराने देण्याचे निश्चित केले. त्यासाठी टोईंग व्हॅनचा ठेका घेणा-या ठेकेदारास दरवर्षी एक कोटी 10 लाख रुपये देण्याचे निश्चित केले. त्यानुसार 5 एप्रिल 2022 पासून वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅनद्वारे शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईला सुरवात झाली. त्यामध्ये नो – पार्किंगचा दंड 500 रुपये, टोईंग व्हॅन चार्जेस 200 रुपये, जीएसटी 36 रुपये असा एकूण 736 रुपयांचा दंड आकारण्यास सुरवात झाली. नो – पार्किंग’चा दंड वाहतूक पोलिसांकडून शासनाच्या खात्यात आणि टोईंग व्हॅनचे चार्जेस महापालिकेला असे ठरविण्यात आले. त्यानुसार आत्तापर्यंत वाहतूक पोलिसांनी टोईंग चार्जेसचे 55 लाख 77 हजार 394 रुपये महापालिकेकडे जमा केले.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *