- November 2, 2022
- No Comment
कीरकोळ वादातुन दोन भावांमध्ये बेदम मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपळे गुरव: भावाने भावांना उसने दिलेले पैसे परत मागितले असता दोन भावांनी बेदम मारहाण केली. ही घटना काशिदनगर , पिंपळे गुरव येथे घडली.
प्रमोद गौतम भारती (वय32, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोद गौतम भारती, अमोद याची पत्नी आणि मनोजकुमार गौतम भारती (तिघे रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे भाऊ अमोद आणि मनोजकुमार यांना सहा महिन्यांपूर्वी उसने पैसे दिले होते. ते पैसे त्यांनी परत मागितले. त्यावरून तिघांनी फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. अमोद याने फिर्यादी यांच्या ओठाला चावा घेऊन जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.




