• November 2, 2022
  • No Comment

भरधाव वेगात कारची रिक्षाला धडक, रिक्षा चालक जखमी

    पिंपरी: भरधाव वेगात जाणाऱ्या कारने रिक्षाला धडक दिली. त्यात रिक्षा चालक जखमी झाला असून रिक्षाचे नुकसान झाले आहे. ही घटना नेहरू नगर, पिंपरी येथे घडली.

    नामदेव बब्रुवान टमके (वय 40 रा. मोशी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या रिक्षाचे नुकसान झाले असून फिर्यादी नामदेव हे जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळावरून निघून गेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

     

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *