• November 3, 2022
  • No Comment

घरातून चार मोबाईल चोरीला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

घरातून चार मोबाईल चोरीला, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    निगडी: घरातून 39 हजार रुपयांचे चार मोबाईल चोरीला गेले आहेत. ही घटना निगडीतील यमुनानगर येथे घडली.

    सुशांत बळवंत लोंढे (वय 21, रा. यमुनानगर, निगडी. मूळ रा. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे तीन मित्र यमुनानगर येथील अजिंक्य रामभाऊ उबाळे यांच्या खोलीत भाड्याने राहतात. रविवारी सकाळी सहा ते साडेसात वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. उघड्या दरवाजावाटे आत येऊन चोरट्याने फिर्यादी आणि त्यांच्या तीन मित्रांचे 39 हजारांचे मोबाईल फोन चोरून नेले.

    निगडी पोलीस तपास करीत आहेत

    Related post

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…
    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *