• November 7, 2022
  • No Comment

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणारा तरुण जेरबंद

    पुणे: बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

    केशव अशोक राठोड (वय २४, रा.चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलिसांना हद्दीत गस्त घालण्याची सूचना करण्यात आली आहे. यानुसार सिंहगड रोड पोलीस हद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान पोलीस अंमलदार अमेय रसाळ व देवा चव्हाण यांना बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, सिंहगड क्षेत्रिय कार्यालयाच्या पाठिमागील डीपी रोडला एकजण पिस्तूल घेऊन उभा आहे. त्यानूसार सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर, सहाय्यक निरीक्षक सचिन निकम, पोलीस अंमलदार अमेय रसाळ व त्यांच्या पथकाने सापळा रचून पकडले.

    तत्पुर्वी पोलिसांची चाहूल लागताच केशव हा पळाला. पण, पोलिसांनी त्याला लागलीच पाठलाग करून पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या कंबरेला एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी ते जप्त केले असून, त्याने हे पिस्तूल कोणाकडून आणले व त्याचा वापर तो कुठे करणार होता, याचा तपास केला जात आहे.

    Related post

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…
    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    मार्केट यार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुकीचे बिगुल; ३० एप्रिलला मतदान

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : मार्केट यार्डमधील फळ, भाजीपाला, केळी, पान तसेच कांदा-बटाटा विभागातील आडत्यांची शिखर संघटना असलेल्या श्री छत्रपती…
    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने त्रस्त बाजार

    गुलटेकडी मार्केट यार्डात तुंबलेल्या ड्रेनेजमुळे घाण पाण्याचा पूर; दुर्गंधीने…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पूणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबत असल्याने नागरिक, व्यापारी आणि शेतकरी यांना मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *