• November 7, 2022
  • No Comment

१९ वर्षीय तरुणाचा खून; २० ते २५ जणांनी केले वार

१९ वर्षीय तरुणाचा खून; २० ते २५ जणांनी केले वार

    तळेगाव: तळेगावमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा हकनाक बळी गेला आहे. २० ते २५ जणांच्या टोळक्याने कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आहे.

    प्रणव उर्फ जय मांडेकर वय- १९ वर्षे अस हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. तो इंद्रायणी कॉलेजमध्ये एफ.वाय. बी.कॉमचे शिक्षण घेत होता. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. मयत प्रणव हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडला होता परंतु, सोबत असलेल्या तरुणाची एका सोबत फोनवर बाचाबाची झाली. त्या तरुणाला मारण्यासाठी २० ते २५ जणांचे टोळके तिथे आले व त्यांच्याकडून प्रणवला त्यांचा साथीदार समजून त्याची हत्या करण्यात आली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव हा मित्राचा वाढदिवस आहे असे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री साडे नऊच्या सुमारास आई स्वाती यांनी मुलगा प्रणवला फोन केला तेव्हा त्याने जेवण झाले आहे निघतच आहे असे म्हणून फोन ठेवला. मात्र, दीड तास उलटला तरी मुलगा का आला नाही म्हणून पुन्हा आईने फोन केला आणि तो फोन तळेगाव पोलिसांनी उचलला आणि प्रणवचा खून झाल्याचे आईला सांगितले. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर समजले की, प्रणवच्या सोबत असलेल्या विशालचे मंगेश सोबत फोनवर बाचाबाची झाली होती यातूनच हा प्रकार घडल्याचा त्यांना सांगण्यात आले.

    प्रणवसह नऊ जण इदगाह मैदान कडोलकर कॉलनी येथे गप्पा मारत बसले होते. तेव्हा, मंगेशसह एकूण २० ते २५ जणांचे टोळके सहा ते सात दुचाकीवरून तिथे आले. त्यांच्याकडे कॊयता , पालघन, लोखंडी रॉड होते. मंगेश प्रणव सोबत असलेल्या विशालला म्हणाला की तुला खूप मस्ती आली आहे आता तुझी मस्तीच उतरवतो असे म्हंटल्यावर सर्व जण घाबरले. प्रणवसह सर्व जण मिळेल त्या दिशेने पळायला लागले. प्रणव धावत असताना काही अंतरावर ठेच लागून खाली पडला. तेव्हा, त्याला गाठून तो वर्माचा साथीदार आहे अस समजून त्याला कोयता, लोखंडी रॉड ने वार करून ठार मारण्यात आले. खून केल्यानंतर टोळक्याने हवेत कोयता फिरवत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. घाबरून तेथील दुकानदारांनी दरवाजे खिडक्या बंद केल्या असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *