• November 7, 2022
  • No Comment

तरुणाच्या खूनातील चार आरोपी जेरबंद, तळेगाव दाभाडे पोलिसांची कामगिरी

तरुणाच्या खूनातील चार आरोपी जेरबंद, तळेगाव दाभाडे पोलिसांची कामगिरी

    तळेगाव: इंदोरी येथील तरुणाच्या खूनातील 4 आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर 5 हून अधिक आरोपींचा शोध सुरू आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 2) आनंद भोईटे यांनी दिली.

    याबाबत अनिल मांडेकर यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. काल रविवार, नोव्हेंबर 6 च्या रात्री 9.30 ते 10.30 वा च्या दरम्यान प्रणव उर्फ जय मांडेकर, वय 19 वर्षे, रा. इंदोरी, तालुका मावळ, जिल्हा पुणे याचा खून करण्यात आला होता.

    या प्रकरणातील आरोपी कुणाल ठाकूर, ढुंगण बाळ्या उर्फ रोहन सुरते, विकी पवार, मंगेश हिरे, निलेश घायके, सागर गाडे, रितेश शिंदे, चिक्या शिंदे, प्रथमेश पवार व इतर यांच्या विरोधात भा.द.वि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मयत प्रणव मांडेकर हा त्याच्या मित्रांसोबत ईदगाह मैदान, तळेगाव दाभाडे येथे गप्पा मारत बसलेला होता. त्याचा मित्रा विशाल वर्मा व आरोपी मंगेश हिरे यांच्यात फोन वर झालेल्या भांडण व बाचा बाची वरून आरोपी कुणाल ठाकूर, ढुंगण बाळ्या उर्फ रोहन सुरते, विकी पवार, मंगेश हिरे, निलेश घायके, सागर गाडे, रितेश शिंदे, चिक्या शिंदे, प्रथमेश पवार व इतर यांनी आपापसात संगणमत करून मयत व त्याचे मित्र बसलेल्या ठिकाणी 6 ते 7 दुचाकीवरून आले. त्यांनी मयत व त्याच्या मित्रांवर दहशत निर्माण करुन त्यांना मारण्यासाठी आणलेले कोयते, लोखंडी रॉड काढले.

    त्यामुळे मयत व त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी तेथून पळत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यावेळी मयत व त्याचा मित्र कौस्तुभ खाडे हे तुकारामनगरकडे पळत होते. त्यावेळेस मयत प्रणव मांडेकर याला ऋग्वेद रुग्वेद हॉस्पीटल, तुकाराम नगर येथे ठेचं लागून खाली पडला.वरील त्यांच्यासोबत आणलेल्या कोयते लोखंडी रॉड यासारख्या हत्यारांनी मयताच्या डोक्यावर वार करून तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्याचा खून केल्याचे कौस्तुभक खाडे यांनी पळताना मागे वळून पाहिले आहे.

    तसेच वरील गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून पळून जात असताना तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यातील फिर्यादी ब्ल्लू खिल्लारे याचा मित्र मौसम शाहू हा आरोपी चिके चिक्या शिंदे यांच्या मैत्रिणी सोबत बोलतो व मेसेज करतो व फिर्यादी हा त्याच्यासोबत राहतो या कारणावरून या फिर्यादीत जे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे या दोन्ही गुणांच्या अनुषंगाने आरोपी सागर गाडे, रोहन सुरते, अमित टकले, मंगेश हिरे, प्रथमेश बोरुडे यांना ताब्यात घेण्यात आले असून 4 विधी संघर्षित बालके यांच्याकडे चौकशी सुरू असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

    सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2, आनंद भोईटे, डॉ. काकासाहेब डोळे, साहेब पोलीस आयुक्त देहूरोड विभाग पुणे शाखा पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे गणेश जवादवाड,(Indori murder) वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडणी विरोधी पथक अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक गुन्हे नितीन लांडगे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उपनिरीक्षक संदेश इंगळे, शरद शिपने, मारुती मदेवाड राहुल कोळी व इतरांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *