- November 16, 2022
- No Comment
तरूणीशी गैरवर्तन करणाऱ्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल, दोन टाळकी जेरबंद
बावधन: सब वे’मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलेशी गैरवर्तनूक करत तिला धमकी देत तिचा छळ करणाऱ्या तिघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
प्रकार आदित्य शगून मॉल येथे ‘सब वे’ शॉपमध्ये घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि.15) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी गणेश कमलाकर बनसोडे (वय 23 रा.बावधन), नवनाथ सुखदेव बोऱ्हाडे (वय 22 रा.बावधन), सचिन गणेश पाटील (रा.बावधन) यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सचिन व नवनाथ यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याने फिर्यादी या अल्पवयीन आहेत हे माहित असताना देखील पगार देण्याच्या बहाण्याने बोलावून धमकी देत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. यावेळी नवनाथ याने त्यांना साथ दिली. तसेच, फिर्यादीला पळून घेऊन जा, मी सगळी सोय करतो असे सांगितले. तर, सचिन याने फिर्यादीला हा सर्व प्रकार बघून अश्लिल शेरा दिला. व फिर्यादीला गणेशशी लग्न कर म्हणून दबाव टाकला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.