- November 16, 2022
- No Comment
तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुंड गजाआड
भोसरी: मी फुले नगरचा भाई आहे म्हणत हातात तलवार घेऊन सायंकाळी वर्दळीच्यावेळी रसत्यावर दहशत पसरवणाऱ्या तडीपार गुंडाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
प्रकार मंगळवारी (दि.15) सायंकाळी भोसरी येथील महात्मा फुलेनगर येथील कमानीजवळ घडला.
चन्नाप्पा परशुराम सुतार (वय 23 रा.भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याला एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे यांनी 5 ऑगस्ट 2021 पासून दोन वर्षा करीता पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षेत्रातून तडीपार केले होते. असे असतानाही तो परीसरात आला व त्याने बेकायदेशीररित्या हातात तलवार घेऊन ती फिरवत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी फुलेनगरचा भाई आहे असे म्हणून तलवार फिरवली. यावरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.