• November 20, 2022
  • No Comment

प्रतिबंधित गुटखा विक्री साठी साठवल्या प्रकरणी, दोन टाळकी जेरबंद

प्रतिबंधित गुटखा विक्री साठी साठवल्या प्रकरणी, दोन टाळकी जेरबंद

     

    पिंपरी: गुटखा साठवणूक केल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांवर गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. ही कारवाई संत तुकारामनगर पिंपरी येथे करण्यात आली.

    बापू उर्फ बापूसाहेब महादेव जिंजरे (वय 37, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याला अटक केली आहे. त्याला गुटखा पुरविणारा दर्शन (पूर्ण नाव माहिती नाही. रा. विजापूर, कर्नाटक) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या घरात प्रतिबंधित गुटखा विक्री साठी साठवून ठेवला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जंजिरे याच्या घरावर छापा मारून कारवाई केली. त्यात दोन लाख 11 हजार 292 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. त्याला दर्शन याने गुटखा पुरवला असल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहार. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *