• November 22, 2022
  • No Comment

कोयत्याच्या धाकाने खंडणी मागणारी चार टाळकी गजाआड

कोयत्याच्या धाकाने खंडणी मागणारी चार टाळकी गजाआड

     

    मुंढवा: कोयत्याचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना दुकानदारांना धमकावणारे आणि खंडणीची मागणी करणाऱ्या चार जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. मुंढवा पोलीस स्टेशनच्या आदित्य केशवनगर परिसरात हा सर्व प्रकार घडला.

    आरोपींनी कोयत्याच्या धाकाने दुकानात प्रवेश करत व्यापाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
    आकाश अनिल जाधव, सोहेल शब्बीर शेख, अनिकेत सुनील पुरी आणि आदित्य कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी व्यापारी उमाराम दुर्गाराम चौधरी (वय 43) यांनी तक्रार दिली होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहा वाजता सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या किराणा मालाच्या दुकानात शिरले. कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी पैशाची मागणी करत दुकानातील साहित्याची तोडफोड केली. तसेच फिर्यादींना ठार मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यानंतर आरोपींनी हवेत कोयता फिरून परिसरात दहशत निर्माण केली होती. आरोपी विरोधात तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारही आरोपींना अटक केली आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *