• November 23, 2022
  • No Comment

महिलेची निर्घृणपणे हत्या करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेला रोमिओ जेरबंद

महिलेची निर्घृणपणे हत्या करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेला रोमिओ जेरबंद

     

    पिंपरी चिंचवड: चाकूने गळा चिरून व दगडाने ठेचून महिलेची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह झुडपात फेकून देवून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रियकरास महाळुंगे पोलीस व पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेवून बेड्या ठोकल्या आहेत.

    निकिता संभाजी कांबळे (वय – 28, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर राम कुंडलिक सूर्यवंशी (वय – 39, रा. पवार वस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे,) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सहाय्यक फौजदार हनुमंत बांगर ( रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड ) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत फिर्याद दिली होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता कांबळे व राम यांचे यापूर्वी एकत्रित एलेप्रो मॉल चिंचवड येथे काम करीत असताना ओळख झाली. त्यानंतर काही दिवसांनी निकिता हिचे आणखी कोणाशी तरी प्रेम संबध असल्याबाबत राम याला संशय आला. तसेच आरोपी राम याचे लग्न झाल्यामुळे त्याच्या घरातील लोकांना सदर

    प्रेमसंबंधाबाबत माहिती झाली होती. त्यामुळे राम याची पत्नी त्याच्या बरोबर बोलत नव्हती. तसेच निकिता ही सुद्धा राम याच्याबरोबर बोलत नव्हती. ती त्याला टाळू लागली होती. त्यामुळे रागाच्या भरात राम याने रविवारी (दि. 20) दगडाने ठेचून व धारदार हत्याराने गळा चिरून निघृण निकिता हिची हत्या केली.

    मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राम याने निकिता हिचा मृतदेह खराबवाडी (ता. खेड) हद्दीतील विनायक रेवजी खराबी यांच्या मालकीच्या जमीन गट नं. ३८६ मध्ये दक्षिण दिशेला असणाऱ्या ओढ्यालगतच्या बांधावरील झुडपामध्ये फेकून दिला. त्यानंतर राम हा रातोरात गायब झाला. महाळुंगे इंगळे पोलीसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे राम याचा शोध घेत पुणे येथील सिम्बोयसीस परिसरातून त्यास ताब्यात घेवून तातडीने जेरबंद केले.

    दरम्यान, निकिता ही खराबवाडी येथे तिचा भाऊ व तिच्या दोन लहान मुलांसह राहत होती. तिच्या पतीचे गेल्या सहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे. ती येथे एका खाजगी कंपनीत काम करत होती. महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *