- November 27, 2022
- No Comment
पुणे शहरात पीएमटी / पीएमपीएमएल बस मध्ये प्रवाश्यांची लुट करणारे अट्टल गुन्हेगार अटक त्यांचेकडुन ०५ गुन्हे उघड ९६,००० /- रोख ऐवज जप्त
युनिट- १, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी हे आरोपींची
माहिती घेत असताना, पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, बसमध्ये प्रवास
करणारे प्रवाशी यांचे पैसे चोरणारे चोरटे हे बुधवार चौकाजवळील बस स्टॉप येथे चोरी करण्यासाठी
येणारे आहेत. मिळालेली महिती पोउनि सुनिल कुलकर्णी यांना दिली. त्याप्रमाणे अधिकारी व अंमलदार
यांच्या टिम तयार करुन बुधवार चौका जवळील बस स्टॉपवर सापळा रचुन बातमीदारांने
सांगितल्याप्रमाणे
दोन इसमांना जागीच ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नावे पत्ते विचारता त्यांनी आपले नावे
पत्ते १) अविनाश ऊर्फ चार्ली सिद्राम जाधव, वय ३२ वर्ष रा. जनसेवा बँकेजवळ मश्जिद पाठीमागे
केशवनगर, मुंढवा, पुणे २) आर्दश नारायण गायवाकड, वय ३१ वर्षे, रा. महादेव मंदीराजवळ, स.नं.९४,
सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे असे असल्याचे सांगीतले.
त्यांना युनिट-१ कार्यालयात आणुन त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांचेकडे बस
स्टॉपवर व बस मध्ये प्रवास करीत असताना प्रवाशी यांचे पैसे चोरी केली याबाबत विश्वासात घेवुन
तपास करता त्यांनी गेले वर्षापासुन शिवाजी रोडने जाणारा, भापकर पेट्रोल पंप ते सातारा रोड, न-हे
ते हुजुरपागा, कात्रज ते महाराष्ट्र हौंसिंग बोर्ड, आळंदी ते विश्रांतवाडी, काळेवाडी ते विदयापीठ, पुणे
स्टेशन ते वाघोली असे बसमध्ये प्रवास करणारा प्रवांश्याची खिश्यातील, महिल्यांच्या बॅगेतील पैसे चोरत
होतो असे सांगितले.
त्याप्रमाणे फरासखाना, खडक, सहकारनगर, येरवडा, चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनकडील
प्रत्येकी १ गुन्हे असे ५ गुन्हे उघडकीस आणले असुन त्यांचेकडुन एकुण ९६,००० /- रुपये मुद्देमाल
जप्त करण्यात आले आहे. सदर आरोपी यांना पुढील कारवाईकरीता फरासखाना पोलीस स्टेशन पुणे
यांचे ताब्यात दिले आहे. सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन पुणे शहरातील विविध पोलीस
स्टेशनला एकुण १६ गुन्हे दाखल आहे.