- November 27, 2022
- No Comment
पुणे शहरात गजबजलेल्या भर वस्तीत दगडाने ठेचुन वार करुन खुन करुन दहशत निर्माण करुन फरार झालेले मुख्य सुत्रधारासह २ सराईत गुन्हेगार यांना १२ तासात गजाआड
दिनांक २३/११/२०२२ रोजी समर्थ पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक – २०९/२०२२ भादवि
कलम ३०२,१४३,१४४,१४७, १४८, १४९ क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट चे कलम ७ मपोकाक ३७ (१) प्रमाणे
खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
युनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी यांना सदर घटनेची
माहिती मध्यरात्री मिळताच घटनास्थळी भेट देवुन आरोपींची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार
यांनी आरोपी खुन करुन फरार झालेनंतर नातेवाईक व मित्रांसोबत संपर्कात असलेबाबत माहिती
मिळवली.
मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या ४ टिम तयार करुन
सदर भागात आरोपींचा शोध घेवुन अथक परिश्रमानंतर तीन आरोपी उंड्री चौकात १) सुशांत ऊर्फ
मटया शशीकांत कुचेकर वय २८ वर्ष रा. ८४३ नाना पेठ राजेवाडी पुणे २) तेजस अशोक जावळे वय
३२ वर्ष रा. ८५७ नाना पेठ राजेवाडी पुणे ३) अतिष अनिल फाळके वय २७ वर्ष रा. ८३८ नाना पेठ
राजेवाडी पुणे यांना जागीच ताब्यात घेवुन, त्यांना युनिट-१ कार्यालयात आणुन त्यांचेकडे अधिक तपास
करता,त्यांनी वर नमुद खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाणे
यांचे ताब्यात दिले आहेत.
सदर आरोपींकडे गुन्हे शाखा युनिट १ कडुन अधिक तपास करता सदर आरोपींनी
सदरचा खुन पुर्ववैमनस्यातुन केल्याचे सांगितले सदर आरोपींपैकी सुशांत कुचेकर याचेवर खुनाचा
प्रयत्न, दरोडयाची तयारी, दरोडा, गंभीर दुखापत, मारामारी, विनयभंग, हत्यार बाळगणे असे एकुन १६
गुन्हे पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच आरोपी तेजस जावळे याचेवर एकुन ७
गुन्हे दाखल आहेत हे दोन्ही आरोपी पुणे शहरातुन दोन दोन वेळा पुणे शहर व पिंपरी चिंचवड
आयुक्तालय तसेच पुणे जिल्हा येथुन २ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते.