• November 27, 2022
  • No Comment

अनेकांना गंडा घालणारा तोतया पोलीस गजाआड

अनेकांना गंडा घालणारा तोतया पोलीस गजाआड

    पुणे शहर व येरवडा, कल्याणीनगर, कोरेगांव पार्क, विमाननगर या भागात रात्रीच्या वेळी अंगात
    खाकी कपडे, त्यावर जर्किंग घालुन लोकांना पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणा-या
    इसमा बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी खास मोहिम आखुन तोतया पोलीसास पकडुन कारवाईचे आदेश
    दिलेले होते. सदरबाबत येरवडा पोलीस ठाणे गु.र.न.५४५/२०२२ भा.द.वि. कलम ४२०, १७० प्रमाणे
    गुन्हा दाखल करण्यात आला होता.


    पोलीस निरीक्षक,गणेश माने यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दाखल
    गुन्हयातील आरोपीचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
    प्रमोद ढेरे हा स्विफ्ट गाडी नंबर एमएच /१२/एलजे/०४१८ या गाडीत ईराणी मार्केट जवळ आहे. त्याने
    पोलीसांच्या सारखे केस कापलेले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याप्रमाणे तोतया पोलीस प्रमोद
    बाळु ढेरे,वय-३० वर्षे,रा. सर्व्हे नं.१२, लक्ष्मीनगर, श्रीकांत सुपर मार्केट जवळ, लहुजी वस्ताद कार्यालयाचे
    समोर, येरवडा, पुणे यास तो वापरत असलेली मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कारच्या काचेवर मोठया
    अक्षरात POLICE असे लाल अक्षरात रेडीयमने लिहीलेले व त्यावरती पोलीसांचा मोनोग्राम लावलेली, त्या
    कारमधुन पोलीस वापरतात तश्या शिट्टया व लाठी असा सर्व मिळुन ५,९०, १८० /- रुपये किचा ऐवज
    जप्त करण्यात आलेला आहे.


    सदर आरोपीकडे अधिक तपास करता तो १२ वी पास आहे. परंतु तो कोणत्याही कारणा
    शिवाय पोलीस ठाणे, कोर्टात जातो. तेथे नेहमी फिरुन पोलीसांची कार्यपध्दती, त्यांचे चालणे-बोलणे,
    राहणीमान यांचा अभ्यास करुन, त्याप्रमाणे तो राहुन लोकांची पोलीस असल्याची बतावणी करुन
    फसवणुक करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीस पुढील कारवाईकरीता येरवडा
    पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *