- April 24, 2023
- No Comment
पवना नदीच्या काठालगत दारूभट्टीवर पोलिसांचा छापा, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
शिरगाव: शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये दहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला.
पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर दोन महिलांनी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याची भट्टी लावली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 10 लाख 10 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला.
पुढील तपास शिरगाव पोलीस करीत आहेत.