- April 24, 2023
- No Comment
वाकडमध्ये सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
वाकड: पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 21) सायंकाळी उघडकीस आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला.
मयत व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या, मारहाणीच्या खुणा प्रथमदर्शनी दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे यामध्ये घातपाताची कोणतीही शक्यता नसल्याचे दिसत आहे. मयत व्यक्ती दारूच्या नशेत पडला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू आहे.