• April 24, 2023
  • No Comment

हिस्सा मागत केले एकावर कुऱ्हाडीने जिवघेणे वार

हिस्सा मागत केले एकावर कुऱ्हाडीने जिवघेणे वार

    पुणे: पहाटेच्या वेळी एका व्यक्तीच्या घरासमोर जाऊन आमच्या आईचा हिस्सा दे, असे म्हणत त्यावर कुऱ्हाडीने वार केले. तसेच मारहाण करून जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील खालुम्ब्रे येथे घडली.

    अनिल दामोदर घनवट, सतीश अशोकराव वानखेडे, अक्षय सर्वगोड (सर्व रा. खालुम्ब्रे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अशोक सुरेश तुळवे (वय 37) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चार वाजता झोपेतून उठून फिर्यादी घराबाहेर आले. त्यावेळी आरोपी तिघेजण फिर्यादी यांच्या घराच्या बाहेर थांबले होते. फिर्यादी यांनी आरोपींना एवढ्या सकाळी घरी येण्याचे कारण विचारले असता, माझ्या आईचा हिस्सा दे, असे म्हणून अनिल घनवट याने फिर्यादीवर कुऱ्हाडीने वार केले.

    त्यानंतर सतीश आणि अक्षय यांनी फिर्यादीस हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. दरम्यान भांडणाच्या आवाजाने फिर्यादी यांच्या घरातील इतर सदस्य घराबाहेर आले असता आरोपी तिथून पळून गेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    नुकतीच घर वापसी केलेली सायली सुर्वे हिचे अपहरण की हत्या

    नुकतीच घर वापसी केलेली सायली सुर्वे हिचे अपहरण की…

    पुणे: नुकतीच घर वापसी करून आलेली हिंदू युवती सायली सुर्वे हिचे तिचा माझी पती आतिफ तासे यांनी अपहरण केलेले आहे. तिचा…
    हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी अटकेत

    हडपसरमध्ये धक्कादायक प्रकार; अल्पवयीन मुलीशी छेडछाड, २४ तासांत आरोपी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे – हडपसर परिसरात अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी तत्पर तपास करत…
    हडपसर परिसरातून दुचाकी चोरी करणारा चोरटा अटकेत; आठ दुचाकी जप्त

    हडपसर परिसरातून दुचाकी चोरी करणारा चोरटा अटकेत; आठ दुचाकी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : हडपसर परिसरात दुचाकी चोरी करून दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *