• June 30, 2023
  • No Comment

मिठाईच्या दुकानातील साहित्याची तोडफोड करूण पळून जानारे आरोपींना पोलिसाने पाठलाग करुण पकडले

मिठाईच्या दुकानातील साहित्याची तोडफोड करूण पळून जानारे आरोपींना पोलिसाने पाठलाग करुण पकडले

    हडपसर:  मिठाईच्या दुकानातील साहित्याची काल सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तोडफोड केली. त्यानंतर मोटारसायकलवर पळून आरोपींचा पोलिसाने पाठलाग केला. सहा किमी अंतरावर आरोपींची मोटारसायकल घसरून ते खाली पडले. त्यातील एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून दोघे जण फरार झाले आहेत.

    हडपसरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी चैतन्य स्वीट अँड सेंटरमध्ये घुसून दुकानातील काचेची कपाटे व फ्रिजची लोखंडी कुऱ्हाडीने तोडफोड केली. रात्रपाळीवर असलेले पोलिस विजयकुमार ढाकणे हे शेवाळवाडी चौकात आले असताना ही घटना घडत होती. त्यांनी फोनवरून ही घटना पोलिस तिघांनी ठाण्यात कळविली. त्यानंतर त्यांनी मोटारसायकलवर पळून जाणाऱ्यांचा जाणाऱ्या पाठलाग केला. सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आरोपींची मोटारसायकल घसरून ते खाली पडले व ते उसाच्या शेतात पळून गेले.

    पाठीमागून ढाकणे यांच्या मदतीला एक पोलिस पथक पोचले व त्यांनी उसात लपलेल्या एका १७ वर्षीय मुलाला गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह ताब्यात घेतले. दुसरा आरोपी गौरव संतोष अडसूळ (वय १९, रा. कॉलनी नंबर पाच, शेवाळवाडी) व एक अल्पवयीन मुलगा पळून गेला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *